चिंचवडमध्ये खड्ड्यात दिवे लावून ‘आप’चे आंदोलन

0
267

पिंपरी , दि,४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि त्यावर पडलेले शेकडो खड्डे अद्यापही बुजविले नसल्याचा निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने खड्ड्याभोवती मातीच्या पणत्या लावून आंदोलन करण्यात आले.निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि त्यावर पडलेले शेकडो खड्डे अद्यापही पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुजवलेलेनाहीत.ठेकेदार लोकप्रतिनिधी,अधिकारी यांच्या भ्रष्ट युतीमुळे शहरातील नागरिकांना धोकादायक खड्डे चुकवत जगावे लागत आहे.

आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात खड्डे सर्वेक्षण योजना राबवून खड्डे मोजवेत. संबंधित ठेकेदार,अधिकारी यांना रिजेक्शन चार्जेस लावून मोफत दुरुस्ती करून घ्यावी. भविष्याच्या दृष्टीने शहरातील रस्त्यांचे हिस्ट्री कार्ड तयार करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली.

चिंचवड स्टेशन येथे आज (शुक्रवारी) झालेल्या आंदोलनात चेतन बेंद्रे, ब्रह्मानंद जाधव, यशवंत कांबळे, गोविंद माळी, प्रविण शिंदे, सुंदर ओव्हाळ, चंद्रमनी जावळे, मीना जावळे, अजय सिंह, शिवाजी कदम, सोमनाथ बनसोडे, वाजीद शेख, रोहित सरनोबत, कमळ गवई, भागूबाई खाडे, मालिनी पवार, आजीनाथ सकट, राजेश सापरे, सुरेश भिसे, आशुतोष शेळके, संदीप राठोड, आकाश इंगळे, संतोषी नायर, सचिन पवार आदी सहभागी झाले होते.