चिंचवडमध्‍ये एकावर कोयत्‍याने वार

0
69

चिंचवड, दि. 26 (पीसीबी) : काय पाहतोस, सरळ निघ, नाहीतर खल्‍लास करून टाकेल, अशी धमकी देत एकावर कोयत्‍याने वार करण्‍यात आले. ही घटना सोमवारी (दि. २५) दुपारी सव्‍वाचार वाजताच्‍या सुमारास शंकरनगर, चिंचवड येथे घडली.

राहूल रनविर सिंह (वय ३६, रा. गणेश हौसिंग सोसायटी, ताम्‍हाणे वस्‍ती, चिखली) असे जखमी व्‍यक्‍तीचे नाव असून त्‍यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर झोंबाडे (रा. शंकरनगर, चिंचवड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सव्‍वाचार वाजताच्‍या सुमारास फिर्यादी यांच्‍या गाडीला आरोपीने दुचाकी आडवी लावली. शिवीगाळ करीत आमच्‍याकडे काय पाहतोस, सरळ निघ नाहीतर खल्‍लास करून टाकेल, अशी धमकी दिली. त्‍यानंतर कोयत्‍याने फिर्यादी राहूल यांच्‍या डोक्‍यावर, हातावर तसेच डाव्‍या बरगडीजवळ वार करीत गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.