चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, तर कसब्यात रविंद्र धंगेकर

0
290

चिंचवड, दि. १ (पीसीबी) : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता.२६) मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी (२ मार्च) लागणार आहे. याआधी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचा दोन खासगी संस्थाचा एक्झिट पोल समोर आला आहे. यामध्ये स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांनी या पोटनिवडणुकीसाठीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या तर कसब्यात महाआघाडीचे रविंद्र धंगेकर हे बाजी मारणार असल्याचे अंदाज व्यक्त केला आहे.

चिंचवडमध्ये काय होणार? :
– द स्ट्रेलेमा या संस्थेच्या सर्व्हेनुसार, चिंचवडमध्ये भाजपला जागा राखण्यात यश येण्याचा अंदाज आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना 1 लाख 5 हजाराच्या आसपास मते मिळण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 93 हजार आणि राहुल कलाटे यांना 60 हजाराच्या आसपास मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘रिंगसाईड रिसर्च’च्या अंदाजानुसार, चिंचवडची जागा भाजपच जिंकेल असा अंदाज आहे. तसेच रिंगसाईडच्या सर्वेक्षणानुसार, उमेदवाररनिहाय मतदानाच्या टक्केवारीची विभागणी.

– अश्विनी जगताप (BJP) : 45 टक्के ते 47 टक्के
– नाना काटे (NCP) : 31 टक्के – 33 टक्के
– राहुल कलाटे (अपक्ष) : 18 टक्के – 20 टक्के
– इतर : 2 टक्के – 4 टक्के
– भाजपचे विजयी मताधिक्य : 12 टक्के – 16 टक्के

कसब्यात काय होणार ?
-स्ट्रेलिमा या संस्थेच्या सर्व्हेनुसार, कसब्यात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या पराभवाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा 15 हजार मताधिक्यांनी विजयी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हेमंत रासने यांना 59 हजाराच्या आसपास तर रविंद्र धंगेकर यांना 74 हजाराच्या आसपास मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या गुरुवारी (२ मार्च) निकाल लागणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातून कोण बाजी मारणार? हे निकालानंतरच समोर येणार आहे