– भाजपा नेत्याशी संबंधीत कंपनीकडे काम असल्याने संशय बळावला
– वाढिव खर्चावर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची गुळणी
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) : पिंपरी चिंचवडस महापालिकेतील विविध प्रकल्पांचे खर्च मूळ निविदा रकमच्या दामदुप्पट होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. प्राधिकरणातील नियोजित ग.दि.माडगूळकर नाट्यगृहाचा खर्च २३ कोटींचा आता सुमारे ७३ कोटींपर्यंत वाढला असून असेच दुसरे उदाहरण आता समोर आले आहे.
पवना नदीवर थेरगाव येथील प्रसुनधाम शेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर थेरगाव – चिंचवड बटरफ्लाय पुल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या उंचीत वाढ करावी लागल्याने मुळ कामाच्या परिमाणात वाढ झाली. त्यामुळे मुळ निविदा रकमेमध्ये पुलाचे काम पूर्ण करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी उर्वरीत सबग्रेडचे काम, डांबरीकरण, काम करण्याकरिता १४ कोटी ४८ लाख रूपये खर्चाचे नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार, हे काम सन २०२२-२३ च्या मुळ अंदाजपत्रकात समाविष्ट करून प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. पूल पूर्ण होईपर्यंत हा खर्च आणखी काही कोटींना वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे काम एका भाजपा नेत्याशी संबंधीत कंपनीकडे असून शहर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उध्दव ठाकरे यांची शिवसेना त्यावर काहीच भाष्य करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
थेरगाव येथील प्रसुनधाम हौसिंग सोसायटी शेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर थेरगाव – चिंचवड हा बटरफ्लाय पुल बांधण्यात येत आहे. हा पुल धनेश्वर पुलाशेजारी होत असून या पुलाचा समावेश महापालिका विकास आराखड्यामध्ये झालेला आहे. नव्याने थेरगाव – चिंचवड पुल केल्यास बिर्ला रूग्णालयाशेजारील पुलावरील वाहतुक बNयाच अंशी कमी होणार आहे. या पुलाचा उपयोग हिजवडी, ताथवडे, पुनावळे तसेच पुण्याकडील भागांना चिंचवड, पिंपरीगाव या परिसरात जाण्यासाठी जास्त प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. नव्याने करण्यात येणाNया पुलाच्या दोन्ही बाजुपैकी थेरगाव भागाकडील साधारणत: ९० टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. तसेच चिंचवडकडील जागाही ताब्यात आहे. या पुलाचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेतर्पेâ सन २०१७ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा खर्च २५ कोटी १९ लाख रूपये अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांनी १४ टक्के म्हणजेच २८ कोटी ७१ लाख रूपये असा जादा दर सादर केला. इतर दोन ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर कमी असल्याने त्यांना या पुलाचे बांधकाम देण्यात आले.
या कामास ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ घेण्यात आली आहे. या कामात मुख्य पुलाचे काम तसेच पोहोच रस्त्याचे काम यांचा अंतर्भाव करण्यात आला होता. तथापि, या कामासाठी जलसंपदा विभागाच्या तरतुदीनुसार, पुलाच्या उंचीचे नियोजन करून मुख्य पुलाचे डिझाईन करण्यात आले. या डिझाईननुसार, पुलाच्या उंचीत वाढ करावी लागली. त्यामुळे मुळ कामाच्या परिमाणात वाढ झाल्याने मुळ निविदा रकमेमध्ये पुलाचे काम पूर्ण करणे शक्य होत नाही. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी उर्वरीत काम करण्याकरिता नवीन अंदाजपत्रक तयार करून काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी या कामाचा महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या मुळ अंदाजपत्रकात समावेश करून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने पुलाचे काम करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १३ जून २०२२ रोजी बैठक घेतली होती. त्यात बटरफ्लाय पुलाच्या कामातील उर्वरीत कामे करण्यासाठी स्वतंत्र निविदा कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना देण्यात आल्या. त्यानंतर २२ जुलै २०२२ रोजी या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. बटरफ्लाय पुलाच्या सद्यस्थितीतील कामांच्या अनुषंगाने थेरगाव बाजूकडील पोहोच रस्त्यास वॉल बांधणे, मुरूम भराव करणे, रस्त्याचे सबग्रेडचे काम, डांबरीकरण, व्रॅâश बरियर तसेच चिंचवड बाजूकडील रस्त्याचे सबग्रेडचे काम, डांबरीकरण, व्रॅâश बरियर आणि दिशादर्शक फलक अशी उर्वरीत कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. या बाबींचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सन २०२१-२२ च्या मंजुर दरसुचीनुसार आणि महापालिकेच्या मंजूर दरपृथ्थकरण यानुसार, प्रकल्पाचे सल्लागार श्रीखंडे कन्सल्टंट यांच्यामार्पâत अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम १४ कोटी ४८ लाख रूपये इतकी येत आहे. सद्यस्थितीत चालू असलेल्या पुलाचा वापर होण्यासाठी उर्वरीत कामे करणे आवश्यक आहे. त्याकरिता हे काम महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या मुळ अंदाजपत्रकात ‘विशेष योजना’ या लेखाशिर्षाअंतर्गत समाविष्ट करून प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.