चाळीसगावच्या चोरानेचं पाठीत खंजीर खुपसला; उन्मेष पाटलांची मंगेश चव्हाणवर जहरी टीका

0
61

चाळीसगाव, दि. 28 (पीसीबी) : विधानसभा निवडणुका जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होईन अखेर आता उमेदवारांच्या नावांची लिस्ट जाहीर होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली असून महायुतीलाच पुन्हा सत्ता मिळते की मविआ सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतं याचा निकाल 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. मात्र निवडणुकीची घोषणा होताचा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण मात्र जोरात सुरू झालं आहे. दरम्यान महाविकास आघआडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, चाळीसगाव मतदारसंघही त्यापैकीच एक. चाळीसगाव येथीस जागेवर ठाकरे गटाच्या उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं असून पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारावर कडाडून टीकास्त्र सोडलं आहे.

या चाळीसगावचा जो चोर आहे त्याने देखील माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी जोरदार टीका उन्मेष पाटील यांनी महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्यावर केली. महाराष्ट्रातील 40 गद्दार हे पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून गेलेच, ते संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं. पण त्याच यादीत आणखीही एक, अलीबाबा म्हणून चाळीसगावच्या चोराने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणून या अलीबाबाला हद्दपार करण्यासाठी चाळीसगावच्या नवीन क्रांतीचे पर्व आपण सुरु करत आहेत. अशा शब्दांत ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी भाजपचे आमदार तसेच चाळीसगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या वर टीकास्त्र सोडलं.

एक नालायक मित्र निघाला मी त्याला धन्यवाद देईल त्याने माझी उमेदवारी कापली. त्यांच्यामुळे मला महाविकास आघाडीचे घटक होता, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन. तुम्ही तिकीट कापलं त्यामुळे स्वाभिमानाने शिवबंधन बांधत मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. नालायक मित्र गेल्याचं दुःख मला नाही, परंतु राजूदादा सारखा मला मोठा भाऊ मिळाला त्याचं समाधान मला आहे, असे पाटील म्हणाले.