चिखली, दि. ५ (पीसीबी) – वाहन चालक म्हणून काम करणा-या कामगाराने मालकाच्या गोडाऊन मधून दोन लाख रुपयांचे भंगार मटेरियल चोरून नेले. ही घटना मागील एक महिण्यापासून पाटीलनगर, चिखली येथे घडली.
अब्दुल जलील अन्सारी (वय 43, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 3) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर सुशील पाटील (वय 26, रा. पाटीलनगर, चिखली), अजय कांबळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सना कार्पोरेशन नावाचे गोडाऊन आहे. आरोपी मयूर पाटील हा फिर्यादी यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करतो. त्याने मागील एक महिन्यापासून त्यांचा साथीदार अजय कांबळे याच्यासोबत मिळून फिर्यादी यांच्या गोडाऊन मधून दोन लाख रुपयांचे तीन टन 800 किलोचे एम एस सर्कलचे स्क्रॅप मटेरियल चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.