चालकाने गुंगीचे औषध देऊन ज्येष्ठास लुटले

0
117

वाकड,दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
कारवरील चालकाने मालकाला गुंगीचे औषध देऊन घरातील सहा लाख 41 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 14) सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान स्विस काऊंटी सोसायटी, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रफिक ऊर्फ समीर जमादार (वय 42, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मधुमेह आणि रक्तदाबाचे औषध देताना त्यामधून गुंगीचे औषध फिर्यादी यांना दिले. फिर्यादी यांना गुंगी आल्यावर आरोपीने फिर्यादी यांच्या हातातील साडेतीन लाखांचे ब्रेसलेट, एक लाख 80 हजारांची चैन, एक लाख रुपयांचा चैनीतील डायमंडचा गणपती, सहा हजार रुपयांची पाकिटातील रोख रक्कम, पाच हजार रुपयांची कारची चावी, गाडीचे आरसी बुक, बँकेचे क्रेडिट कार्ड असा एकूण सहा लाख 41 हजारांचा ऐवज चोरून करून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.