चालकाने केला ट्रॅक्टरचा अपहार

0
87

हिंजवडी, दि. 11 (पीसीबी) : मालकाने विश्वासाने ताब्यात दिलेल्या ट्रॅक्टरचा चालकाने अपहार केला. हा प्रकार 24 सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत मारुंजी येथे घडला.

सचिन साळवे असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पंकजकुमार विजय सिंह (वय 43, रा. मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज कुमार यांनी त्यांचा ट्रॅक्टर आरोपी सचिन याच्या ताब्यात दिला. सचिन याने दीड लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरचा अपहार केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.