चालकाच्या निष्काळजीपणामुळे रिक्षा पलटी; प्रवासी महिला जखमी

0
313

चाकण, दि. १८ (पीसीबी) – रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा निष्काळजीपणे चालवली. त्यामुळे रिक्षा पलटी होऊन रिक्षातील प्रवासी महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चाकण ते खराबवाडी रोडवर रानुबाई मळा येथे घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच 12/क्यूए 4804) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आरोपीच्या रिक्षा मधून जात होत्या. आरोपीने त्याच्या ताब्यातील रिक्षा भरधाव वेगात चालवली. त्यामुळे रिक्षा पलटी झाली. या