चार लाखांचे बांधकामाचे साहित्य चोरीला

0
389

हिंजवडी, दि. १६ (पीसीबी) – बांधकामासाठी आणलेले चार लाख 18 हजारांचे साहित्य एका चोरट्याने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 13) सकाळी पारखेवस्ती, माणगाव येथे उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महेश सीताराम दमाई (वय 24, रा. घोटावडे, मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शरद दगडू राठोड (वय 33, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पारखेवस्ती, माणगाव येथे बांधकामासाठी साहित्य आणून ठेवले आहे. बांधकामासाठी आणलेले स्टील, लोखंडी गट्टू असा एकूण चार लाख 18 हजारांचा माल आरोपीने चोरून नेला. हा प्रकार फिर्यादी यांच्याच लक्षात आल्याने त्यांनी फिर्यादी दिली. पोलिसांनी आरोपीच्या गाडीचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.