दि. 13 (पीसीबी) – इंदूरमधील परशुराम कल्याण मंडळाने ब्राह्मण जोडप्यांसाठी एक घोषणा केली आहे. मंडळाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी सांगितले की, चार मुले जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. मध्य प्रदेशातील इंदूर येथील परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांचे ही घोषणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चार अपत्ये निर्माण करणाऱ्या ब्राह्मण जोडप्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा परशुराम कल्याण मंडळाने केली आहे. ब्राह्मणांनी कमी मुले निर्माण केली तर बिगर हिंदू देश ताब्यात घेतील. असेही ते म्हणाले आहेत. हे विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोक या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर अनेक जण त्यावर टीकाही करत आहेत.
मध्य प्रदेशच्या इंदूरमधील परशुराम कल्याण मंडळाच्या अध्यक्षांनी लोकसंख्या वाढवल्याबद्दल पुरस्कार जाहीर केला आहे. ज्यांना चार मुले आहेत त्यांच्यासाठी मंडळाच्या प्रमुखाने एक नवीन ऑफर दिली आहे. विष्णू राजोरिया यांनी तरुण ब्राह्मण जोडप्याने जर चार मुले जन्माला घातल्यास या जोडप्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भोपाळमध्ये आयोजित एका सामाजिक कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमाला संबोधित करताना राजोरिया म्हणाले की, ‘पाखंडी लोकांची संख्या वाढत आहे. कारण आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष देणे मोठ्या प्रमाणात बंद केले आहे. मला तरुणांकडून खूप अपेक्षा आहेत. आपण जुन्या लोकांकडून फार अपेक्षा करू शकत नाही. भावी पिढ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. तरुण स्थिरावतात आणि एका मुलानंतर थांबतात. मी तुम्हाला किमान चार मुले जन्माला घालण्याची विनंती करतो. असेही विष्णू राजोरिया म्हणाले.
पुढे बोलताना राजोरिया म्हणाले की, तरुणाई त्यांना वारंवार सांगतात की शिक्षण आता महाग झाले आहे. कसा तरी उदरनिर्वाह करा, पण मूल होण्यात मागे राहू नका. नाहीतर पाखंडी लोक या देशाचा ताबा घेतील. राजोरिया पुढे म्हणाले की, त्यांची ही घोषणा हा सरकारी उपक्रम नसून वैयक्तिक उपक्रम होता. ते म्हणाले, ‘हे माझे सामाजिक विधान आहे, जे एका सामुदायिक कार्यक्रमात दिले आहे. ब्राह्मण समाजातील उच्च पदांसाठी मुलांचे शिक्षण आणि प्रशिक्षण या वचनबद्धतेची पूर्तता करू शकते, असेही ते म्हणाले