चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण; माहेरहून पैसे आणण्याची मागणी

0
182

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) महाळुंगे,
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. तसेच पत्नीला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. याप्रकरणी पत्नीने पती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 9 जून रोजी रात्री निघोजे येथे घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय जळबा भेरजे (वय 35, रा. बेतकबिलोली, ता. नायगाव, नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय याने पतीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच गाडीचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन याची मागणी करत पत्नीला मारहाण करून शिवीगाळ केली. तलवारीने मारून पत्नीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर दुखापत केली. तलवारीच्या दांड्याने डाव्या पायाच्या नळीवर मारून दुखापत करून माहेरहून पैसे आणले नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.