चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून

0
340

चाकण, दि. २१ (पीसीबी) – दोन्ही अपत्ये मतिमंद जन्मल्याने पतीने पत्नीचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 19) दुपारी कुरुळी येथे घडली.मैना सतीश जाधव (वय 35) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी सतीश भानुदास जाधव (रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋषिकेश भारत थिटे (वय 23, रा. थेरगाव. मूळ रा. बीड) यांनी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश हा फिर्यादी यांचा मेव्हणा आई. फिर्यादी यांची बहीण मैना यांना दोन अपत्ये झाली. ती दोन्ही अपत्ये मतिमंद आहेत. तसेच मैना यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतीश याने त्यांना हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली. सतीश याने केलेल्या मारहाणीत मैना गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सतीश याला अटक केली आहे. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.