महाळुंगे,दि. 18 (पीसीबी)
चारित्र्यावर संशय घेत २४ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. १५) दुपारी दोनच्या सुमारास आसखेड खुर्द येथे राम कोकणे यांच्या शेतात घडली. याप्रकरणी महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आंबादास दत्तू नाईकवाडे (वय ५०), भरत राजकुमार नाईकवाडे (२३), राम राजकुमार नाईकवाडे ( २५, सर्व रा. आसखेड खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी चारित्र्याच्या संशयावरून महिलेला मारहाण केली. तिला सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या प्रशांत कसबे यांनाही लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ केली.