चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर हातोड्याने डोक्यात वार

0
142

चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने महिलेवर जीवघेणे वार करणाऱ्या तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.15) पहाटे नाणेकरवाडी, चाकण येथे घडली आहे.

यावरून पोलिसांनी विश्वंभर अर्जुन आडे (वय 36 रा.चाकण) याला अटक केली आहे. चाकण पोलीस ठाण्यात गजानन पेमा चव्हाण (वय 28 रा. चाकण) यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीवर आरोपीने चारित्र्यावर संशय घेतला व त्याच रागातून त्याने लोखंडी हातोड्याने डोळ्या जवळ व कानावर मारून गंभीर जखमी केले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.