चाकूच्या धाकाने एकास भर दिवसा लुटले

0
245

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चाकूचा धाक दाखवून तिघांनी एकाला भर दिवसा लुटले. ही घटना शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता अशोक थिएटर जवळ, पिंपरी येथे घडली.

सुरेंदर उर्फ दिनेश अर्जुनदास मेवानी (वय 42, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी तीन अनोळखी इसमाच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेंदर हे प्रॉपर्टी एजंट आहेत. शनिवारी दुपारी ते त्यांच्या घराजवळ असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून चाकू सुरेंदर यांच्या गळ्याला लावला. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये रोख रक्कम, 23 हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने काढून नेले. दरम्यान आरोपींनी सुरेंदर यांना बेदम मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.