चाकण-शिक्रापूर रोडवर दोन कंटेनरची समोरासमोर धडक

0
192

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) चाकण,
चाकण-शिक्रापूर रोडवर दोन कंटेनरची समोरासमोर धडक बसली. या अपघातात दोन्ही कंटेनर चालक जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 31) मध्यरात्री साडेबारा वाजता बहूळ गावच्या हद्दीत घडला.

परमजीत भगवान भारती (वय 22, रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार दिनकर रखमाजी कुटे (वय 38, रा. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिराय्डी भारती हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर (एमएच 04/एलई 1487) शिक्रापूर येथून चाकणच्या दिशेने घेऊन येत होते. बहूळ गावच्या हद्दीत आल्यानंतर चाकण कडून शिक्रापूरकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच 40/बीएल 9260)ने भारती यांच्या कंटेनरला धडक दिली. त्यामध्ये दोन्ही कंटेनरचे मोठे नुकसान झाले. दोन्ही कंटेनर चालक भारती आणि आरोपी कुटे जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.