चाकण मध्ये पोलिसाच्या घरावर सशस्त्र दरोडा

0
77

चाकण, दि. 14 (पीसीबी) : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव येथे पोलीस अंमलदाराच्या घरावर सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. ही घटना रविवारी (दि. 13) पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास घडली. दरोडेखोरांना प्रतिकार करताना पोलीस अंमलदार जखमी झाले आहेत.

अनिकेत पंडित दौंडकर (वय 25, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा दरोडेखोरांनी अनिकेत दौंडकर यांच्या घरावर सशस्त्र दरोडा घातला. आरोपींनी 42 हजार 500 किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 12 हजार 500 रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 55 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. त्यावेळी अनिकेत दौंडकर यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने अनिकेत यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.