चाकण मध्ये पकडली ३६ लाखांची रोकड

0
50

चाकण, दि. 07 (पीसीबी) : चाकण पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत एका कारमधून तब्बल ३६ लाख ३९ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली. बुधवारी (दि.६) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

चाकण पोलिसांनी चाकण शिक्रपूर रस्त्यावर अचानक नाकाबंदी लावली होती. त्यावेळी एका संशयित इनोवा क्रिस्टा मोटारीच तपासणी करण्यात आली. मोटारी मध्ये तब्बल ३६ लाख ३९ हजारांची रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकड ताब्यात घेतली असून आयकर विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही रोकड कोठून आणली तसेच कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार होती याबाबत तपास सुरू असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.