चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

0
243

चाकण, दि. ५ (पीसीबी)- चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने छापा मारला. यामध्ये एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई सोमवारी (दि. 4) सायंकाळी मोहितेवाडी येथे करण्यात आली.

कमलेश राजपूत (रा. मोहितेवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उमेश पुलगम यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोहितेवाडी येथे संतोष कदम यांच्या शेतात दारू भट्टी लावली. पाच हजार लिटर दारू तयार करण्यासाठी त्याने एक लाख रुपये किमतीचे रसायन एकत्र करून त्याची भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दरोडा विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.