चाकण पोलिसांची रासे गावात दारूभट्टीवर कारवाई

0
72

चाकण, दि. 22 (पीसीबी) : खेड तालुक्यातील रासे गावात सुरू असलेल्या दारू भट्टीवर चाकण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई मध्ये एक लाख 85 हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई 20 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अर्जुन बिरबल राठोड आणि एक महिला (दोघे रा. रासे फाटा, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार किरण घोडके यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चाकण-शिक्रापूर महामार्गावर रासे फाटा येथे बेकायदेशीरपणे दारूभट्टी लावली. दारू तयार करण्यासाठी आरोपींनी रसायन भिजत ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी दारूभट्टीवर कारवाई केली. या कारवाई मध्ये एक लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.