चाकण तळेगाव रोडवर टेम्पोची रिक्षाला धडक

0
102

महाळुंगे, दि. १५ (प्रतिनिधी)
चाकण तळेगाव रोडवर एका टेम्पोने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. १३) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला.
उत्तम मारुती गाडे (वय ४५, रा. सदुंबरे ता. मावळ, जि. पुणे) असे अपघातात जखमी झालेल्‍या रिक्षा चालकाने नाव असून त्‍यांनी गुरुवारी (दि. १४) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच ४३ एडी ३०२९) या टेम्‍पोवरील अज्ञात चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी गाडे हे आपल्‍या रिक्षातून तळेगाव चाकण रस्‍त्‍यावरून चालले होते. ते खालुंब्रे गावाच्‍या हद्‌दीत असलेल्‍या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आले असता त्‍यांच्‍या रिक्षाला आरोपी चालवत असलेल्‍या टेम्‍पोने जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्‍पो चालक गाडे हे गंभीर जखमी झाले. तसेच त्‍यांच्‍या रिक्षाचेही नुकसान झाले. अपघातानंतर टेम्‍पो चालक घटना स्‍थळी न थांबत, जखमी वैद्यकिय उपचारासाठी मदत न करता पळून गेला. महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.