महाळुंगे, दि. 17 (पीसीबी) : चाकण एमआयडीसी परिसरात व्यवसाय करण्यासाठी महिन्याला एक लाख दहा हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 16) दुपारी बारा वाजताच्या सुमारास वाघजाई नगर येथे घडली.
प्रदीप उर्फ गोटया पडवळ (वय 31, रा. आंबेठाण, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अमोल दामोदर शेडगे (वय 35, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाला फोनवर शिवीगाळ व दमदाटी केली. चाकण एमआयडीसीत व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला एक लाख दहा हजार रुपये हप्ता दे. हप्ता दिला नाही तर तुमची विकेट टाकून जीवे ठार मारणार, अशी धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.













































