चाकणमधून बांगलादेशी दांपत्‍यास अटक

0
8

बनावट कागदपत्रांद्वारे काढले आधार कार्ड आणि मतदान कार्ड

दि.24 (पीसीबी)बनावट कागदपत्रांच्‍या आधारे आधार कार्ड आणि मतदान कार्ड काढून भारतात अवैधरित्‍या राहणार्‍या बांगलादेशी दांपत्‍याला चाकण पोलिसांनी अटक केली.

टिंकु चौधरी (वय ३१, आधार कार्ड नं. ५४८१३१५३९६४८) व खादिजा खातुन (वय २४, मतदान कार्ड क्रमांक SWD8771297, दोघेही रा. साईराज लॉजिंग, आळंदीफाटा, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

सोमवारी (दि. २३) चाकण पोलीस ठाण्‍याचे अधिकारी व कर्मचारी गस्‍त घालत होते. त्‍यावेळी दहशतवाद विरोधी पथकातील (ATC) पोलीस हवालदार सुनील शिंदे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, आळंदी फाटा येथील साईराज लॉजिंगमध्ये बांग्लादेशी दांपत्‍य सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. त्‍यानुसार पोलिसांच्‍या पथकाने पंचासमक्ष खात्री केली असता दोघेजण मिळून आले. त्यांच्‍याकडे असलेल्‍या ओळख पत्रांची पडताळणी केली असता ही ओळखपत्रे बनावट असल्याचे दिसून आले. आरोपी दांपत्‍याने त्यांचे मुळ वास्तव्याचे ठिकाण छालचुरा, पोस्ट रानटिया, जिनेगती थाना, जिल्हा शेरपुर, राज्य ढाका, देश बांग्लादेश असल्याचे सांगितले. त्‍यानुसार त्‍या दांपत्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिंकात महावरकर, अपर आयुक्त, वसंत परदेशी, उपायुक्त विवेक पाटील, शिवाजी पवार, सहायक आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांच्‍या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, निरीक्षक नाथा घार्गे, सहायक निरीक्षक प्रसंन्न ज-हाड, गणपत धायगुडे, उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, पोलीस हवालदार सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, राजू जाधव, रेवणनाथ खेडकर, सुनील भागवत, शरद खैरनार, किरण घोडके, उध्दव गर्जे, उषा होले, सरला ताजणे यांच्‍या पथकाने केली.