चला दुर्गा टेकडीवर भेटूया, नदी प्रदूषणावर बोलूया! (29 मार्च सकाळी 7 वाजता)

0
31

मुळा, पवना आणि इंद्रायणी या आपल्या शहरातील नद्या दिवसेंदिवस प्रदूषित होत आहेत. सांडपाणी, रासायनिक कचरा, आणि इतर घातक घटक या नद्यांमध्ये मिसळत आहेत. या समस्येवर उपाय शोधण्याऐवजी प्रशासन नदी काठ सुशोभित करण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, सिमेंट काँक्रिटच्या भिंती, चौपाटी, जॉगिंग ट्रॅक आणि रस्ते उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

यामुळे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होईल, पूरस्थिती अधिक गंभीर बनेल आणि भूजल पातळीही घटेल. अनेक पर्यावरणतज्ञ, सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. चिंचवड, वाकड, बाणेर, पिंपळे सौदागर येथील नागरिकही पुढे येत आहेत.

चला आपणही एकत्र येऊया!
⏳ तारीख: 29 मार्च
🕖 वेळ: सकाळी 7 वाजता
📍 स्थळ: दुर्गा टेकडी
https://maps.app.goo.gl/mrCaWz5arcJZBWAE6

आपला विरोध दाखवूया आणि नद्यांचे रक्षण करूया!