चऱ्होली ग्रामस्थांची आयुक्त कार्यालयात घोषणाबाजी

0
4

दि . १९ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त दर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत सर्वसामान्य जनतेला भेटत असतात. ती आयुक्त साहेबांना भेटण्याची वेळ आहे.
त्याप्रमाणे आज रोजी आयुक्त साहेबांच्या कार्यालयातून भेटीची वेळ घेण्यात आली होती.. त्याप्रमाणे काही प्राथमिक प्रतिनिधींना आयुक्त साहेब आज रोजी भेटणार होते..

परंतु मोठ्या संख्येने ग्रामस्थ आल्यामुळे त्यांनी पालिकेत येण्याचे टाळले. हा चऱ्होली ग्रामस्थांचा, शेतकऱ्यांचा, प्रामाणिक करदात्यांचा अपमान आहे. आतापर्यंत दोनदा आपण आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु आयुक्त भेटत नाहीत.
चौकशी केली असता घरी आराम करत आहेत असे समजते.

यावेळी चऱ्होली ग्रामस्थांनी प्रत्यक्ष आयुक्त कार्यालय मध्ये बैठक मांडून घोषणाबाजी केली…

माझे सर्व ग्रामस्थांना आवाहन आहे, हा लढा आपल्याला अर्ध्यात सोडायचं नाही..
आणि महानगरपालिकेला थेट इशारा आहे चऱ्होली ग्रामस्थांना हलक्यात घेऊ नका.. वेळप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बंद पाडू.. परंतु टीपी आरक्षण आणि टीपी च्या नावाखाली टाकलेले डीपीचे भूत देखील उतरवल्याशिवाय राहणार नाही…