चऱ्होलीकर संतापले, गुरुवारी टीपी विरोधात मोठी बैठक

0
9

पिंपरी, दि. २१ – चऱ्होली टीपी स्किमसाठी १४२५ हेक्टर म्हणजे ३.५६२ एकर आणि डीपी तील विविध आरक्षणांसाठी ३५८ एकर क्षेत्र प्रस्तावित असल्याने पंचक्रोशितील भुमीपूत्रांनी बाह्या सरसावल्या आहेत. चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी परिसराच्या हजारो भुमीपुत्रांना याचा फटका बसणार असून भूमिहिन होण्याची वेळ येणार आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे अनेत धनदांडगे, बिल्डर आणि राजकारण्यांचे हजारो एकर क्षेत्र या सर्व आरक्षणातून पध्दतशीरपणे वगळण्यात आल्याने संशयाचे वातावऱण आहे. दरम्यान, याच विषयावर पुढची भुमिका निश्चित करण्यासाठी टीपी हटवा, ७ / १२ वाचवा मोहिम ग्रामस्थांनी हाती घेतली आहे.
या निमित्ताने सर्व ग्रामस्थांनी राजकीय जोडे बाजुला ठेवत एकीचे दर्शन घडविले असून उद्या गुरुवारी (२२मे) सकाळी १० वाजता विठ्ठल रुक्मिनी मंदिरात विशेष बैठक आयोजित केली आहे.

या ठिकाणी टीपी आरक्षणाविरोधात ग्रामस्थांचे मीटिंग होणार आहे. मीटिंगमध्ये आयुक्तांनी काय सांगितले त्याबद्दल ग्रामस्थांना कळविण्यात येईल. त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल. मस्त ग्रामस्थ चऱ्होली बुद्रुक बारावाड्या वस्तीवरच्या सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहा, असे आवाहन केले आहे.