चऱ्होलीकरांचा पाणी प्रश्न सोडविणार- अजित गव्हाणे

0
90

-‘तुतारी वाजवा, ७/१२ वाचवा’ म्हणत चऱ्होलीकरांचा थेट मुद्द्यालाच हात

भोसरी, दि. 05 (पीसीबी) : चऱ्होली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या आहेत. गावठाणाबरोबरच वाढत असलेल्या सोसायट्यांमुळे या भागामध्ये पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज आहे त्यामुळे प्राधान्याने चऱ्होलीकरांचा पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी सांगितले. दरम्यान अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ चऱ्होली येथून झाल्यानंतर काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये अजित गव्हाणे यांनी ठिकठिकाणी नागरिकांकडून मिळणारे स्वागत स्वीकारत गावाचा पाणी प्रश्न तातडीने निकालात काढण्यात येईल असे आश्वासन दिले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचार रॅलीला चऱ्होली भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हजारो नागरिक या रॅलीमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यामध्ये महिला भगिनींचा सहभाग मोठा होता.यावेळी माजी नगरसेविका विनया तापकीर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आबा तापकीर, दत्ताभाऊ बुर्डे, कुणाल तापकीर, सागर तापकीर, सुनील पठारे, हरिभाऊ तापकीर, सचिन तात्या तापकीर, अनुज तापकीर,संदीप तापकीर, प्रशांत तापकीर, गणेश ताजने, सोमनाथ तापकीर, चेतन तापकीर, शुभम तापकीर राजुशेठ वाखारे, संतोष तापकीर, विक्रम गिलबिले, श्रेयस चिखले आदी उपस्थित होते.

प्रचार रॅलीच्या निमित्ताने ठिकठिकाणी अजित गव्हाणे यांचे महिला भगिनींकडून औक्षण करण्यात आले. आगामी काळात महिला भगिनींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही असे आश्वासन यावेळी अजित गव्हाणे यांनी दिले. या परिसरात हजारो नागरिक वास्तव्याला आहेत. हा परिसर वेगाने विकसित होत असताना येथे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी कोणतेही नियोजन, व्यवस्थापन करण्यात आलेले नाही हेच या परिसरातील पाणीटंचाईचे कारण आहे. पाणीटंचाईपासून येथील नागरिकांना मुक्त करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. त्यासाठी सक्षम उपायोजना केल्या जातील असा विश्वास अजित गव्हाणे यांनी दिला.

तुतारी वाजवा ७/१२ वाचवा –

भोसरी विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारात वापरल्या जाणाऱ्या घोषणा परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. भोसरी गावठाणा मध्ये एकी हेच बळ, आम्हाला खेळ संपवता येतो या घोषणा चांगल्याच रंगल्या होत्या. तर चऱ्होली येथे तुतारी वाजवा ७/१२ वाचवा ही घोषणा लक्षवेधी ठरली.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मैदानात –

प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरलेले दिसून आले. महाविकास आघाडीची एकजूट अजित गव्हाणे यांना विधिमंडळापर्यंत पोहोचवणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान शिवसेना ,काँग्रेस तसेच इतर घटक पक्षातील कार्यकर्ते नागरिकांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या क्रमांकाचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.