चप्पलच्या किमतीवरून दुकानदार महिलेला कोयत्याचा धाक

0
259

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – चप्पल खरेदी करताना किमतीवरून वाद घालत दुकानदार महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 17) सायंकाळी फिनोलेक्स चौक, पिंपरी येथे घडली.

किरण बिराजदार (वय 20, रा. मोहननगर, चिंचवड), अजय लक्ष्मण जकाते (वय 20, रा. काळेवाडी, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दुकानदार महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे फिनोलेक्स चौकात चप्पल विक्रीचे दुकान आहे. आरोपी रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या दुकानात चप्पल खरेदीसाठी आले. चप्पलच्या किमतीवरून आरोपींनी फिर्यादींसोबत वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून कमरेला असलेला कोयता काढून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.