चक्रेश्वर देवस्थान आवारात पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या वतीने २०० देशी झाडांचे रोपण

0
412

चाकण, दि. २१ (पीसीबी) : पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या वतीने चक्रेश्वर मंदिर देवस्थानच्या आवारात २०० देशी झाडांचे रोपण करण्यात आले. या झाडांच्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सेवानिवृत्त वनाधिकारी बाळासाहेब गवते यांनी घेतली असून त्यासाठी त्यांनी देवस्थान ट्रस्टला ५१ हजाराची देणगी दिली.

यासाठी चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार रामभाऊ कांडगे, उपाध्यक्ष गोपाळ जगनाडे, संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, लक्ष्मण वाघ, पांडुरंग गोरे व देवस्थान ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी बाळासाहेब गवते, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष पी. टी. शिंदे, उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, सचिव राजेंद्र जांभळे, प्रवक्ते व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, संचालिका उर्मिला सांडभोर, शांताराम खाडेभराड, सुरेश खांडेभराड, संभाजी कड यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले.

यावेळी वड, पिंपड, चिंच, बेहडा, गुलमोहर, लिंब, करंज, बांबु, आपटा, वावळा, शिसु आदी प्रकारची २०० झाडांचे रोपण करण्यात आले. ही झाडे वाढविण्याची सर्व जबाबदारी बाळासाहेब गवते व त्यांचे निवृत्त वन कर्मचारी शांताराम खाडेभराड, सुरेश खांडेभराड, संभाजी कड यांनी घेतली आहे.