चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले : मद्यधुंद चालकाची ताफ्याला धडक

0
112

दि. १७ (पीसीबी) – पुणे: मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात ड्रिंक अँड ड्राइव्हच्या घटना घडताना दिसतंय. अशातच भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मद्यधुंद कार चालकाने चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. सोमवारी (दि. 16) रात्री ही घटना घडली.

चंद्रकांत पाटील गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात होते. यावेळी एका मद्यपी वाहन चालकाने त्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक दिली. या घटनेत गाडीचे काही प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती आहे. या घटनेत सुदैवाने चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहेत.

पोलिसांनी मद्यपी चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जात आहे.