चंद्रकांत पाटलांना शाईफेकीची धमकी…

0
270

पिंपरी,दि.१७(पीसीबी) – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. आज त्यांच्यावर पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु.पो.सांगवी , पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या, चंपाच तोंड काळे करा रे, असा धमकी वजा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द्वेष भावना पसरविणे आणि धमकी देणे याबद्दल १५२, ५०५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले, दशरथ बाबुराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मजकूर असलेली पोष्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे.

फेसबुकवर पोस्ट करून आणि व्हाट्सऍप स्टेट्स ठेवून समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पवनाथडी येथे यात्रेसाठी येणार आहेत. हे पाहता धमकी देण्यात आली आहे. यामुळे पवनाथडी यात्रेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.