चंद्रकांतदादांवर शाईफेक करणारे मनोज गरबाडे हे लोकसभा उमेदवार

0
232

दि २६ एप्रिल (पीसीबी ) – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मुदती अखेर ३८ जणांनी अर्ज दाखल केले. महायुतीचे श्रीरंग बारणे, महाआघाडीचे संजोग वाघेर, वंचितच्या माधवी जोशी यांच्यासह आता आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारा मनोज गरबडे हेही उमेदवार आहेत.
मावळमध्ये पहिला अर्ज १९ तारखेला यशवंत पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना) यांनी भरला. तर बारणेंनी २२ एप्रिलला आणि संजोग वाघेरेंनी तो दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिलला, तर वंचितच्या जोशींनी तो परवा म्हणजे २४ तारखेला दाखल केला. अर्ज भरणाऱ्यांमध्ये एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे मनोज गरबडे. ते अपक्ष आहेत. त्यांनी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी फॉर्म नेला. पण, शेवटच्या दिवशी भरला. ते समता सैनिक दलाचा कार्यकर्ते आणि कट्टर आंबेडकरवादी आहेत.
गरबडे यांनी 10 डिसेंबर 2022 ला त्यांनी चिंचवड येथे तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती.अर्ज मागे घेणार नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. मावळमध्ये पहिला अर्ज 19 तारखेला यशवंत पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना) यांनी भरला होता. त्याअगोदर मुख्य उमेदवार महायुतीचे (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे यांनी चार, तर आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील यांनी दोन अर्ज भरले. परवा 24 एप्रिलला वंचित बहूजन आघाडीच्या माधवी जोशी यांनी भरला. या तिघांतच ही लढत होणार आहे. त्यात खरी लढत ही बारणे, वाघेरेंत असून जोशी फक्त किती मते खातात याची उत्सुकता आहे.त्यामुळे या दोघांतील विजयी होणाऱ्याचे लीड जोशी किती मते घेतात तेवढे कमी होणार आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वीस जणांनी 24 अर्ज भरले. हा अर्ज पिंपरी-चिंचवड पालिकेचे माजी नगरसेवक आणि ठाकरे शिवसेनेचे दत्तात्रेय वाघेरे यांनी नेला होता. पण, तो भरला नाही. अन्यथा मावळच्या रिंगात तीन वाघेरे झाले असते. दुसरीकडे छाननीनंतर कितीजणांचे अर्ज वैध ठरतात आणि त्यापैकी माघारीची मुदत संपेपर्यंत किती माघार घेतात यानंतर लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.दरम्यान,एमआयएमने पुण्यात उमेदवार दिला, तसा मावळमध्ये उमेदवार न दिल्याने ही लढत आघाडी, युती आणि वंचित अशी तिरंगीच होणार आहे.