चंदननगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू वेश्या व्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश तर दोघांवर गुन्हा दाखल

0
235

पुणे, दि. १० मे २०२३ (पीसीबी) – पुण्यातील चंदननगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मसाज सेंटरचा मालकासह व्यवस्थापकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे. 

चंदननगर परिसरात डेला थाई नावाचे मसाज सेंटर आहे. या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवला. बनावट ग्राहक डेला थाई मसाज सेंटरमधील वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकताच पोलीसांनी धाड टाकली.

या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेतले आहे. तर मसाज सेंटरच्या मालकासह व्यवस्थापकाच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनिमयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.