घोरपोडी करणाऱ्या 1175 टोळ्यांचा बंदोबस्त

0
96

पिंपरी, दि. ३० जुलै (पीसीबी) – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जबरी चोरी व घोरपोडी करणाऱ्या 1175 टोळीच्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवळल्या आहेत.

या टोळीकडून पोलिसांनी दोन लाख दोन हजार रूपये किमतीचे चार देशी पिस्टल, चार काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या, दहा लाख 75 हजार किमतीचे सोने – चांदीचे दागिने, चार लाख 85 हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल असा ऐकून जवळपास 17 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कुरळी ह्या गावात सुशील उर्फ बारक्या भरत गोरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारासह एका घरात देशी पिस्टल सोबत लपून बसला आहे, अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या दरोडा विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून सुशील उर्फ बारक्या गोरे, अक्षय प्रभाकर कणसे, आणि त्याचे दोन अल्पवयीन गुन्हेगार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यातील चारही आरोपीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जबरी चोरी, घरफोडी मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.