घर झडतीसाठी गेलेल्या सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा, तिघांवर गुन्हा दाखल

0
264

बाणेर, दि. १८ (पीसीबी) – सावकारी अधिनियमान्वये दाखल असलेल्या प्रकरणात एका व्यक्तीच्या घरात झडती घेण्यासाठी गेलेल्या सहकारी संस्थेचे अधिकारी आणि पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. १७) सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत बाणेर येथे घडला.

सहकारी अधिकारी नूतन भोसले यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तनिष मनिष कासलीवाल आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल असलेल्या प्रकरणामध्ये सहकारी संस्थेचे अधिकारी, पंच आणि पोलीस असे सर्वजण शुक्रवारी सकाळी दहा वाजता मनीष राजमल कासलीवाल यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचा मुलगा आणि दोन महिलांनी सरकारी अधिकाऱ्यांना घराची झडती करू दिली नाही. तसेच घरातील एका खोलीचा दरवाजा बंद करून घेत त्या खोलीची झडती घेण्यापासून शासकीय अधिकाऱ्यांना परावृत्त करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.