घर आणि कामाच्या ठिकाणी महिलेची बदनामी, एकावर गुन्हा दाखल.

0
340

वाकड, दि. १ (पीसीबी) – महिलेचा पाठलाग केला, तिच्या कामाच्या ठिकाणी तिची बदनामी करून काम सोडण्यास भाग पाडले. कामाच्या दुसऱ्या ठिकाणी देखील तिची बदनामी केली. ही घटना जून ते 28 सप्टेंबर या कालावधीत वाकड परिसरात घडली.

तुषार वर्मा (वय 35, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचा वारंवार पाठलाग केला. शेजाऱ्यांकडे फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादी काम करत असलेल्या ठिकाणी तिच्याबद्दल चुकीची माहिती दिली. फिर्यादीने ते काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम शोधले. तिथेही आरोपीने फिर्यादीच्या वरिष्ठांना फिर्यादींबाबत चुकीची माहिती देत बदनामी केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.