घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

0
254

चिखली, दि. २१ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी बारा ते सायंकाळी सव्वाचार वाजताच्या कालावधीत त्रिवेणीनगर चौक येथे घडली.

विजय बाळासाहेब मदने (वय १९, रा. त्रिवेणीनगर चौक, त्रिवेणीनगर) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची ६० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १४/एचई ८८११) सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घरासमोर पार्क केली. तिथून अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी सव्वाचार वाजता उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.