घरासमोर पार्क केलेली कार चोरण्याचा प्रयत्न

0
287

वाकड, दि. २८ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेली कार चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास विनोदे वस्ती, वाकड येथे घडली.

सोमीनाथ बन्सी शिंदे (वय 45, रा. विनोदे वस्ती, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी त्यांची कार (एमएच 14/एचडब्ल्यू 0316) घरासमोर विक्रम विनोदे यांच्या जागेत पार्क केली होती. शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी कारचा उजव्या बाजूचा पुढील काच फोडून चावी लावण्याचा जागेजवळील वायर बाहेर काढून त्या कापल्या. तसेच बोनेट चेंबून नुकसान केले. मात्र चोरट्यांना कार चोरून नेता आली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.