घरासमोरून रिक्षा चोरीला

0
70

निगडी, दि. 07 (पीसीबी) : घरासमोर पार्क केलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. २) सकाळी साईनाथनगर, निगडी येथे उघडकीस आली.

समीर हनिफ सययद (वय ३९, रा. अंकुश चौक, साईनाथनगर, निगडी) यांनी मंगळवारी (दि. ५) याबाबत निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी समीर यांनी आपली ५० हजार रुपये किमतीची (एमएच १२ केआर ४५७९) ही रिक्षा शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्‍या सुमारास आपल्‍या घरासमोर पार्क केली होती. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्‍या सुमारास रिक्षा चोरीस गेल्‍याचे दिसून आले. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.