घरासमोरील गोंधळ पाहण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण

0
682

मामुर्डी, दि. ८ (पीसीबी) – घरासमोर गोंधळ सुरु असल्याने काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी गेलेल्या आई आणि मुलाला तिघांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. ७) दुपारी दोन वाजताच्या सुमारास शितळानगर मामुर्डी येथे घडला.

राम स्वामी राजले, राज राजले आणि एक महिला (तिघे रा. शीतळानगर, मामुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरासमोर गोंधळ सुरु असल्याने काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी त्या गेल्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या राजले कुटुंबीयांनी फिर्यादीस आणि त्यांच्या मुलाला विनाकारण शिवीगाळ करून धमकी देत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.