घरावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्‍याचा प्रयत्‍न

0
12

निगडी, दि. २7 (पीसीबी) 
प्रेमसंबंधाच्‍या संशयावरून एका तरुणाच्‍या घरावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. तसेच दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. २५) मध्‍यरात्री पावणे दोन वाजताच्‍या सुमारास ओटास्‍कीम, निगडी येथे घडली.

नवील जमीर शेख (वय ३८, रा. मिलींदनगर, ओटास्क्रिम, निगडी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. दिलशाद सत्तार अहमद (वय ३०, रा. पाण्याचे टाकीजवळ, पेठ क्रमांक २१, ओटास्‍कीम, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी दिलशाद हे बुधवारी मध्‍यरात्री १.५२ वाजताच्‍या सुमारास राहत्‍या घरात झोपले होते. त्‍यावेळी फिर्यादीच्‍या ओळखीचा आरोपी याने त्याची नातेवाईक महिलेसोबत फिर्यादीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या कारणावरुन मनात राग धरुन बाहेरुन घराच्‍या दरवाज्याची कडी लावून घेतली. त्‍यानंतर दरवाज्यावर पेटोल टाकुन घराचे खिडकीतून तुला आता जिवंत जाळून टाकतो, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करुन दरवाजा पेटवून देत फिर्यादी दिलशाद यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तेथून जाताना फिर्यादी हे वापरत असलेली दुचाकी (एमएच १४ जीपी ७९३२) हीची तोडफोड करून नुकसान केले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.