घरावर दरोडा टाकल्या प्रकरणी चौघांना अटक

0
416

पिंपरी दि. १९ (पीसीबी) – खेड तालुक्यातील शेलगाव येथे पाच जणांनी मसाले व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून पैसे काढून घेतले. ही घटना शनिवारी (दि. १८) मध्यरात्री अडीच वाजता घडली. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

आकाश अंकुश जाधव (वय ३२, रा. शिंदेवस्ती, शिक्रापूर, ता शिरूर), सुरज संतोष चौगुले (वय १८), महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय १८, दोघे रा. मंचर जुना बैल बाजार, ता. आंबेगाव), ज्ञानेश्वर पवार (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नवनाथ सोपान राऊत (वय ५०, रा. दत्तवाडी जवळ, शेलगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मसाला व्यावसायिक आहेत. आरोपी मास्क, लोखंडी कोयता, एक्सा पान, कटावणी, मिरची पावडर, कटर स्क्रू ड्रायव्हर, चिकट टेप, लोखंडी पहार अशी हत्यारे घेऊन फिर्यादी यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी आले. फिर्यादी यांच्या घरी काम करणारा कामगार रणजित बिसवास यांना कोयत्याचा धाक दाखवून कॉलर पकडून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.