घरावर दगड मारल्याचा जाब विचारला म्हणून रॉड ने बेदम मारहाण, आरोपींना अटक

0
132

घरावर दगड मारल्याचा विचारला म्हणून वडील व मुलाने दोघांना लोखंडे रॉड ने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री मुळशी दत्तवाडी परिसरात घडली आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तय्युब बाबू शेख (वय 35) व बाबू मेहबूब शेख (वय 60 दोघे राहणार दत्तवाडी मुळशी) या दोघांना अटक केली आहे हिंजवडी पोलीस ठाण्यात गणेश भीमराव वायकर (वय 21 रा. दत्तवाडी मुळशी) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या घरी त्यांचे दाजी, मामा, मित्र असे जेवणासाठी आले होते. यावेळी त्यांच्या घराच्या पत्र्यावर तय्युब याने दगड मारला व तो पळून गेला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक आरोपीच्या घरी गेले असता आरोपीने शिवीगाळ करत लोखंडी गजाने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले. तसेच त्यांच्या बचावासाठी आलेल्या नातेवाईकांना बाबू शेख याने प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करत जखमी केले. हिंजवडी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.