घरावर दगडफेक करत तिघांना मारहाण

0
53

आळंदी, दि. 1 (पीसीबी)

शेतात लघुशंका करू नको असे म्हटल्याने सहा जणांनी मिळून व्यक्तीच्या घरावर दगडफेक करत तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री नऊ वाजताच्या सुमारास केळगाव रोड आळंदी येथे घडली.

महेंद्र किसन मुंगसे (वय 42, रा. केळगाव रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माऊली भांबरे आणि त्याच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माऊली भांबरे हा फिर्यादी मुंगसे यांच्या शेतात लघुशंका करण्यासाठी जात होता. मुंगसे यांनी भांबरे याला शेतात लघुशंका करू नको असे म्हटले. त्यानंतर मुंगसे यांनी आपले घर आतून बंद केले. दरम्यान भांबरे याने त्याच्या पाच साधीदारांना बोलावून मुंगसे यांच्या घरावर दगडफेक केली. मुंगसे यांच्या डोक्यात वीट मारून त्यांना जखमी केले. त्यांचा भाऊ राहुल मुंगसे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यास उसाने मारहाण केली. या भांडणात मुंगसे यांच्या आईला देखील खरचटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.