राजगुरूनगर, दि.26 (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या दोन मुली अचानक गायब झाल्या होत्या. मात्र त्यांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरा एका इमारतीच्या बाजूला दयनीय अवस्थेत आढळले आहे. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या मुली घराजवळून बेपत्ता झाल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथे काल दुपारी दोन चिमुकल्या घराजवळ खेळतांना बेपत्ता झाल्या होत्या. पालकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. पण त्यांचा काही शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर त्या दोघींचे मृतदेह राजगुरूनगर शहरातील एका इमारतीच्या ड्रममध्ये दयनीय अवस्थेत सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे शहर जिल्ह्यासह गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना पाहायाला मिळत आहे. कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे पुण्यासारख्या जिल्ह्यात उडाल्याचे पाहायला मिळत आहे. अपहरण, खून, दरोडे, अशा अनेक गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यात राजगुरूनगर शहरांत घडलेल्या या प्रकारने अनेक तर्क वितर्क समोर येत आहेत. पोलिसंकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे. मात्र, या घटनेनं एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.