घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

0
113

घराबाहेर खेळणाऱ्या एका निरागस मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याला ठिकठिकाणी चावा घेतल्याने त्या ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरमध्ये ही खळबळजनक घटना घडली असून त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. त्या चिमुकल्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.

हल्ल्यात जखमी झालेल्या त्या चिमुकल्या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ते ऐकताच त्या मुलाच्या कुटुंबियांच्या पायाखालीच वाळूच सरकली. चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात दु:खाचे वातावरण असून कुत्र्यांची दहशत कायम आहे.

सदर दुर्दैवी घटना नागपूरच्या मौदा गावातील गणेशनगर मध्ये घडली. शहाणे कुटुंबातील तीन वर्षांचा हा चिमुकला खेळत होता. त्याचे वडील कामासाठी केले होते तर त्याची आई घरकाम करत होती. खेळता-खेळात तो मुलगा घराच्या बाहेर गेटजवळ आला, तिथे आधीच २-३ कुत्री होती. चिमुकला मुलगा एकटा असल्याचे पाहून भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि ते त्याच्यावर तुटून पडले.