घरात भाऊबीज सुरु असताना बाहेर शिवीगाळ

0
242

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – घरामध्ये भाऊबीज सुरु असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने एकास शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पट्टीने मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 25) रात्री वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

सागर अप्पासाहेब लावंड (वय 27, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. सातारा) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन ताम्हाणे आणि त्याच्या एका नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी आणि त्यांचे मेहुणे मंगळवारी रात्री फिर्यादी यांच्या घरात भाऊबीज साजरी करीत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी सचिन याने फिर्यादीस शिवीगाळ करून बाहेर बोलावून घेतले आणि त्यांना लोखंडी पट्टीने मारून जखमी केले. आम्ही इथले स्थायिक आहोत, तुम्ही इथले नाहीत असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांच्या बायकोला शिवीगाळ केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.