घरात डोकावल्याचा जाब विचारल्याने महिलेवर खुनी हल्ला

0
2

महाळुंगे, दि. 19 (पीसीबी)
घरामध्ये डोकावून पाहत असलेल्या तरुणाला महिलेले जाब विचारला. या कारणावरून आरोपी तरुणाने महिलेवर स्क्रू ड्रायव्हरने वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 18) सकाळी आठ वाजताच्या सुमारास आंबेठाण येथे घडली.

गणेश शांताराम जावळे (वय 24, रा. आंबेठाण, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जयसिंग लखनलाल श्रीवास (वय 27, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरामध्ये आरोपी गणेश याने डोकावून पाहिले. त्यामुळे जयसिंग यांच्या पत्नीने गणेश याला जाब विचारत चापट मारली. त्या कारणावरून गणेश याने घरातील किचन ओट्यावर असलेला स्क्रू ड्रायव्हर घेतला. त्याने जयसिंग यांच्या पत्नीच्या गळ्यावर, गालावर, हाताला, पायाला ठिकठिकाणी स्क्रू ड्रायव्हरने वार करत तिला गंभीर जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.