घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला

0
310

भोसरी ,दि. २३ (पीसीबी) – घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातून सोन्याचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजता भोसरी रोड येथे घडली.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात ओंकार त्रिंबक भोसले (वय 29 रा भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून भोसरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा राहिला असता, कुणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश केला व त्याने फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातून दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना उघडकीस आली असता फिर्यादी यांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली. भोसरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.